Ad will apear here
Next
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे. विधानभवनात नुकतेच त्याचे प्रकाशन झाले. त्याचे ई-बुक मोफत उपलब्ध असून, त्याची लिंक शेवटी दिली आहे. 

‘अर्थसंकल्प मांडणे हे जसे क्लिष्ट काम आहे, तसाच तो समजून घेणे आणि समजावून सांगणे हेदेखील अतिशय क्लिष्ट काम आहे. अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगणारे, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे,’ असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

‘अर्थसंकल्पात आर्थिक नियोजन मांडले जाते, तो पैसा सर्वसामान्य नागरिकांचा असतो आणि त्याचे नियोजन कसे केले गेले हे त्याला कळलेच पाहिजे. त्यामुळे अर्थसंकल्पाची भाषा ही सोपीच असावी. तथापि, काही अर्थसंकल्पीय परिभाषांना पर्याय नसतो, त्या परिभाषा या पुस्तकातून समजतील,’ असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

योग्य पुस्तक, योग्य वेळी वाचकांच्या हाती पडत असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केले.

 ‘अर्थशास्त्राचे विद्यार्थी आणि अभ्यासक यांना, तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अर्थसंकल्पावर ज्या चर्चा होतात, त्या संबंधित व्यक्तींच्या समजेवर अवलंबून असतात. या चर्चा अर्थसंकल्पाचे तांत्रिक विश्लेषण करून, आकडेवारीच्या आधारावर होत नाहीत. म्हणून अर्थसंकल्प कसा वाचायचा, हे अधिकाधिक लोकांनी समजून घेतले पाहिजे, असे मला वाटते. म्हणूनच हे पुस्तक लिहिले आहे,’ असे मनोगत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार आशिष शेलार यांनी केले, तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आभारप्रदर्शन केले.

(‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZXHCK
Similar Posts
‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार’ मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच नोव्हेंबर रोजी केले.
महाराष्ट्राचा विकासदर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज; २०१९-२०चा आर्थिक पाहणी अहवाल सादर मुंबई : महाराष्ट्राचा विकासदर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच, राज्याच्या स्थूल उत्पन्नात २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत दोन लाख ४५ हजार ७९१ कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा राज्याच्या २०१९-२०च्या आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून,
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे तीन नव्या योजना मुंबई : देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना शतकाहून जास्त काळ सर्वसमावेशक बँकिंग सेवा देणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी १०१वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी या बँकेतर्फे तीन नवीन सुविधा दाखल करण्यात आल्या.
नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीत शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे मुंबई : ‘नव्या संकल्पना आणि नवे विचार घेऊन नवमहाराष्ट्राची जडणघडण होण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे योगदान महत्वाचे आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक जानेवारी २०२० रोजी मंत्रालयात डॉ. माशेलकर यांच्याशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language